यावल पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू विभागात एकाची हुज्जत ; प्रिंटर फोडून लिपिकास धमकी : पोलिसांत तक्रार दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  (सुरेश पाटील)

यावल येथील पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात एका व्यक्तीने शासकीय कामात अडथळा आणत लिपिकाशी वाद घातला. या वादादरम्यान संशयित आरोपीने कार्यालयातील प्रिंटर फोडून लिपिकास धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(ads)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यावल पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात शासकीय कामकाज सुरू असताना एका व्यक्तीने तेथे प्रवेश केला. कामावरून संबंधित व्यक्तीने तेथील लिपिकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. पाहाता पाहाता वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने कार्यालयातील प्रिंटर उचलून फोडून टाकले तसेच लिपिकाला जीवे मारण्याची / गंभीर प्रकारे धमकी दिली.

(ads)

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे पंचायत समिती आवारात व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस ठाण्यात तक्रार

शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे,कर्मचाऱ्यास धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

(ads)

संबंधित व्यक्तीने प्रिंटर उचलून का फेकले? त्याचे काम वेळेवर आणि मुदतीत झाले नाही का.,? किंवा भांडण कोणत्या कारणावरून झाले.? कारण काहीही असले तरी ग्रामीण भागातील जनतेची कामे वेळेवर होण्यासाठी आणि नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन योग्य ती कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!