रावेर पोलीस स्टेशन येथे गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


हिंदू-मुस्लिम-बौद्ध समाजातील नागरिकांचा शांतता व सौहार्द राखण्याचा निर्धार; प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन

रावेर (राहुल डी गाढे) : आगामी गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत, उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आज दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे हिंदू व मुस्लिम आणि बौद्ध समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची संयुक्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

(ads)

मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत गणपती विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान शांतता, शिस्त व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

(ads)

शहरातील सर्व समाजघटकांनी परस्परांच्या भावना व धार्मिक परंपरांचा आदर राखत गणपती विसर्जन सोहळा उत्साहात पार पाडावा, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा अथवा गैरसमजांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

(ads)

यावेळी हिंदू व मुस्लिम आणि बौद्ध समाजातील उपस्थित प्रतिष्ठित नागरिकांनी शहरातील शांतता व सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कायदा व सुव्यवस्था राखत रावेर शहरात सामाजिक एकोप्याचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

(ads)

बैठकीस मा. SDPO श्री. अनिल बडगुजर, मा. SDM श्री. काकडे, तहसीलदार साहेब, नगरपालिका मुख्याधिकारी (CEO) तसेच SDO, MSEB यांच्यासह पोलीस प्रशासन, शांतता समितीचे सदस्य आणि हिंदू-मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

(ads)

आगामी गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!