निंभोरा बुद्रुक (प्रतिनिधी): भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभा व त्रिरत्न बौद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावासाची कार्तिक पौर्णिमेला समाप्ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कालावधीत सतत तीन महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “भगवान बुद्ध व त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले होते. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक भारतीय बौद्ध महासभा, निंभोरा बुद्रुक शाखेच्या अध्यक्षा उषाताई सुरवाडे होत्या. या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. संजीवकुमार साळवे, उपप्राचार्य, खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर हे होते.
(ads)
प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे, जिल्हा अध्यक्ष सुमंगल तथा रवींद्र अहिरे, एन. टी. इंगळे, सुरेंद्र हिवाळे, डी. एस. सोनवणे, प्रज्ञा खंडारे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे व जिल्हा संघटक वनमाला हिवाळे हे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सर्वप्रथम भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. माता रमाई ग्रुपच्या महिला मंडळाने बुद्धवंदना व त्रिशरण पंचशील घेतले. ग्रंथाच्या शेवटच्या भागाचे वाचन सुमंगल अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश सरदार यांनी केले.
(ads)
सदर कार्यक्रमाचे आयोजन त्रिरत्न बुद्ध विहार व भारतीय बौद्ध महासभा शाखा, निंभोरा बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश खंडारे, लीला चतुर, मुकेश इंगळे, अजय वाघ, गौरव नरवाडे, आशिष सुरवाडे, दिनेश साळवे, हर्षबोधी सरदार तसेच जयंती उत्सव समिती व माता रमाई महिला ग्रुप यांनी परिश्रम घेतले.




