जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक : विजेत्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शकांचा दिमाखदार सत्कार : राजोरे येथे भव्य विजय रॅली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत एल.एम.पाटील विद्यालय,राजोरे येथील विद्यार्थ्यांनी यावल तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला.या उल्लेखनीय यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा दिमाखदार सत्कार करण्यात आला.

(ads)

गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड व गटशिक्षणाधिकारी फिरोजजी पठाण यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा,विज्ञान शिक्षिका तथा मुख्याध्यापिका व मार्गदर्शक शिक्षिका वैशाली इंगळे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विज्ञान नाटकाच्या लेखिका सौ. जयश्री काळवीट तसेच तबलावादक आशिष यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. नाटकाचे मार्गदर्शक दिग्दर्शक डॉ.नरेंद्र महाले सर यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

(ads)

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजोरा शिक्षण मंडळाचे चेअरमन मधुकरजी नारखेडे होते.संचालक प्रा.डॉ.ई. जी.नेहते मुख्याध्यापक संघाचे यावल तालुकाध्यक्ष संजीवजी बोठे,जयंत चौधरी दादा,अंजाळे केंद्राचे केंद्रप्रमुख तुषार सोनवणे, कल्पेश पाटील व मयूर महाजन यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञान नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर राजोरे गावातून विजेत्या विद्यार्थ्यांची भव्य विजय रॅली काढण्यात आली.

ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत पुष्पवृष्टी केली.या यशामुळे संपूर्ण गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

(ads)

गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भावात्मक क्षेत्राचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त केली. केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,आत्मविश्वास व उपक्रमशीलता विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून यावल तालुक्यातील शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.प्रा.डॉ.ई. जी.नेहते यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. 

संजीवजी बोठे यांनी औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणालाही महत्त्व देण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय मनोगतात मधुकरजी नारखेडे यांनी विद्यार्थी जीवनातील यशाचा आनंद अविस्मरणीय असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेला योग्य दिशा देऊन सातत्याने प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. ए.सुरनर यांनी केले,तर आभार मुख्याध्यापिका वैशाली इंगळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत तसेच पालक व ग्रामस्थांचे प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!