यावल ( सुरेश पाटील)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर यावल येथील किरण कुमार यांनी समाजमनाला हेलावून टाकणारी आणि आत्मचिंतन करायला लावणारी एक अत्यंत सुंदर आणि विचारप्रवण / अनेकांना आत्मचिंतन करणारी शुभकामना दिली आहे.
या संदेशाने अल्पावधीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेतले असून नागरिक या विचारांचे कौतुक करत आहेत.
आईची सेवा हीच खरी देवपूजेसारखी "घरातील मातेला आनंद देणे, हेच नऊ दिवसांच्या उपवासाचे खरे फळ आहे," असा मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
शारदीय नवरात्रीचे औचित्य: घटस्थापनेच्या मंगलमुहूर्तावर मांडलेला हा विचार प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे.
यावलकरांचे प्रेरणादायी योगदान - सामाजिक भान ठेवून, समाजातील सर्वांना एक नवी प्रेरणा देणारी ही एक अभिनव आणि मार्गदर्शक शुभकामना ठरत आहे.
खरे आत्मचिंतन-- नऊ दिवस मंदिरात जाऊन देवीची पूजा करण्यापूर्वी आपल्या घरातील जिवंत मातेचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण यातून मिळते.समाजकडून उत्स्फूर्त स्वागत: ही विचारप्रवण करणारी बाब आणि संदेश सोशल मीडियावर अतिशय वेगाने व्हायरल होत असून मातृ सेवेचा संदेश घरोघरी पोचणार असल्याने नागरिकांकडून याचे जोरदार स्वागत होत आहे.


