यावल येथील सुंदरनगरी मधील सरकारी जागेवरील प्लेग्राउंडचे आरक्षण उठविण्याची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील)

यावल नगरपरिषद हद्दीतील सरकारी गावठाण जागेवर असलेले प्लेग्राउंडचे आरक्षण उठवण्याबाबतची मागणी सन १९८० सालापासून वास्तव्यास असलेने यावल शहरातील सुंदरनगर मधील रहिवाशी यांनी आमदार अमोलदादा जावळे व विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


सुंदरनगर मधील रहिवाशी मुकेश रमेश कोळी,विशाल रवींद्र सपकाळे यांनी दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की यावल येथील गट नं. २४६७ हा गट सरकारी गावठाण म्हणून असुन सदर गटामध्ये आम्ही सर्व सुंदरनगर यावल येथील रहिवासी सन १९८० सालापासून रहिवास करीत असुन आम्ही रहिवास जागेस नगरपरीषद यावल लागु असुन घरपट्टी -पाणीपट्टी व विज बिल भरत आलेलो आहोत. तसेच कॉक्रीटीकरण रस्ते गटारी सुद्धा सुविधा उपलब्ध आहेत.


सदर गट नं. २४६७ सरकारी गावठाणवर नगरपरीषद यावल यांनी सन २०१६ पासून प्ले ग्राऊंड साठी आरक्षण केलेलं दिसून येते. सदर जागेवर आमचा रहिवास सन १९८० सालापासुन अंदाजी १०० ते १५० घरे असून ४०० ते ५०० लोक यावस्ती मध्ये रहिवास करीत असुन आपला उदरनिर्वाह मोल मजुरी करुन

राहत आहे तरी सदर जागेवर नगरपरीषद यावल यांनी सन २०१६ सालापासुन प्ले ग्राऊंड साठी आरक्षित कोणत्या प्रकारे केले याबाबत संभ्रम निर्णाम होतो.तरी यावल येथील गट नं. २४६७ हा गट गावठाण असुन जुने अधिकार अभिलेख पाहिले असता सदरची जागा गावठाण विस्तारसाठी असल्याचे दिसुन येतं त्यामुळे सदर गट नं.२४६७ वर नगरपरीषद यावल यांनी सन २०१६ पासून प्ले ग्राऊंड साठी आरक्षण केले आहे ते रद्द करण्यात येवुन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक - जमीन-२०२६ /प्र.क्र.२० / जमीन- १, दिनांक २५ मार्च २०२६ नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमीत करण्याबाबतच्या परिपत्रका नुसार आमच्या सुंदरनगर यावल या रहिवासी जागेस नियमित करुन मिळावे अशी मागणी सुंदरनगरी मधील रहिवाशी नागरिकांनी निवेदनावर आपली स्वाक्षरी करून केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!