वरणगाव महसूल मंडळातील केळी उत्पादकांवर अन्याय ; शिंदे शिवसेना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


"पिक विमा कंपनीला धडा शिकवू, शेतकऱ्यांसाठी प्रसंगी आंदोलनाचा मार्ग धरू" — जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचा इशारा.l

यावल  ( सुरेश पाटील )

वरणगाव महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप करत शिंदे शिवसेनेने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केळी पीक विम्याच्या बाबतीत वरणगाव परिसरातील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पीक विमा कंपनीला योग्य तो धडा शिकवू आणि मायबाप शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी दिला आहे.


प्रमुख ठळक मुद्दे:

अधिकाऱ्यांची भेट व निवेदन --

शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व शेतकऱ्यांची बाजू मांडली.


पुरेपूर नुकसान भरपाईची मागणी ---

वरणगाव महसूल मंडळातील बाधित शेतकरी बांधवांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची पूर्ण आणि योग्य विमा भरपाई मिळावी ही मागणी लावून धरण्यात आली.


प्रशासनाचे आश्वासन---

शिवसेनेच्या मागणीनंतर संबंधित अधिकारी वर्गाने या विषयावर तातडीने बैठक ( मीटिंग ) आयोजित करून योग्य तो मार्ग काढण्याचे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.


लोकप्रतिनिधींशी चर्चा ---

या समस्येबाबत शिवसेना आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि राज्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल असे समाधान महाजन यांनी स्पष्ट केले.


बैठकीस उपस्थित प्रमुख मान्यवर व शेतकरी ---

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते -- समाधान महाजन (शिवसेना जिल्हाप्रमुख), सुभाष चौधरी (शिवसेना उपतालुका प्रमुख),विनोद झोपे ( शिवसेना नगरसेवक, वरणगाव ),

उपस्थित शेतकरी बांधव: रामा मकडू बोंडे,संजय पितांबर झोपे, विनोद सुपडू कोळी,बाली भंगाळे,रणधीर कोळी आदी शेतकरी बांधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!