यावल ( सुरेश पाटील)
यावल एसटी आगारात बसेसच्या योग्य नियोजनाअभावी आणि गाड्यांच्या तुटवड्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.विशेषतः यावल ते भुसावळ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तब्बल दोन-दोन तास बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागल्याची माहिती एक सुज्ञ सुशिक्षित प्रवासी भूषण नगरी असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
वेळापत्रकाचा फज्जा आणि रद्द झालेल्या फेऱ्या मिळालेल्या
आज सोमवार दि.२ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान यावल भुसावळ एकही बस नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
सायंकाळच्या सुमारास पावणे सहा वाजेची भुसावळ जाणारी बस अचानक रद्द करण्यात आली.याबाबत आगाराकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा सूचना फलकावर माहिती देण्यात आली नव्हती.त्यानंतर ६:०० आणि ६:३० वाजेच्या फेऱ्यांविषयी विचारणा केली असता,कोणत्याही गाड्या वेळेवर उपलब्ध झाल्या नाहीत. तब्बल ७:०० वाजेपर्यंत भुसावळसाठी एकही एसटी बस सुटली नाही.प्रवाशांचे आर्थिक नुकसान व मनस्ताप वेळेवर गाड्या न मिळाल्यामुळे पुढील ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचे आरक्षण असणाऱ्या प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावल येथील एक त्रस्त प्रवासी भूषण नगरे दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील ७ सदस्यांसह भुसावळला वेळेवर पोहोचता न आल्याने त्यांचे सुमारे ४,५०० रुपयांचे ट्रॅव्हल्सचे तिकीट वाया गेले.लहान मुले आणि कुटुंबासह प्रवाशांना तासनतास बसस्थानकावर ताटकळावे लागले.
प्रशासनाविरुद्ध संताप
"लांब पल्ल्याच्या गाड्या जात असल्याने स्थानिक फेऱ्या रद्द केल्या" असे मोघम कारण आगार कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या या अयोग्य नियोजनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा
मुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एसटी प्रशासनाने तातडीने भुसावळ मार्गावर जादा गाड्या सोडून प्रवाशांची सोय करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिक करत आहेत.



