यावल ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचा दौरा; सिव्हिल सर्जन व अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय सेवेचा कडक आढावा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील):

महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या आगामी जळगाव जिल्हा दौऱ्याच्या पूर्वतयारी आणि अनुषंगाने, जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील स्वच्छता, आरोग्यविषयक कामकाज आणि भौतिक सुविधांची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी पथकाने यावल ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.  

(ads)

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या आदेशानुसार, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिवदास सुर्यजी चव्हाण आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक विष्णुराव जाधव यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वैद्यकीय सेवेचा सविस्तर आढावा घेतला. 

 (ads)

भेटीदरम्यान तपासण्यात आलेल्या प्रमुख बाबी

स्वच्छता व परिसर: बाह्यरुग्ण (OPD) व आंतररुग्ण (IPD) विभाग, तसेच रुग्णालयाचा संपूर्ण परिसर व स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित काही रुग्णांकडून तसेच उपस्थित दैनिक साईमत पत्रकार सुरेश पाटील,आणि दैनिक सामन्याचे पत्रकार तेजस यावलकर यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊन वैद्यकीय सेवेबाबत भविष्यात काय काय सुधारणार केल्या जातील याबाबत त्यांनी माहिती दिली.

(ads)

वैद्यकीय साहित्यांची तपासणी: औषधसाठा, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, तसेच वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता व कार्यस्थिती तपासण्यात आली.  

कचरा व्यवस्थापन व नोंदवया: जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन (Biomedical Waste Management), अभिलेख (Records) व विविध नोंदवयांची कसून तपासणी करण्यात आली. 

 (ads)

सुधारणेबाबत कडक निर्देश:

या पाहणीदरम्यान आरोग्य संस्थेमध्ये काही त्रुटी किंवा काम-काजात कसूर आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी वैयक्तिकरित्या जबाबदार राहतील, असा सज्जड दम देण्यात आला आहे. तसेच मंत्री महोदयांच्या भेटीपूर्वी रुग्णालयातील सर्व व्यवस्था चोख ठेवण्याच्या आणि आढळलेल्या त्रुटींवर तात्काळ सुधारणात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना या वेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.  

या उच्चस्तरीय दौऱ्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून,ग्रामीण रुग्णालयातील कारभारात शिस्त व सुधारणा येईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.