भीम आर्मीचे एस.टी. प्रशासनाला निवेदन - आदिवासी भागातील बस सेवा तात्काळ सुरू करा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


राज्यात सर्व शाळांना सुट्ट्या लागल्या म्हणून एसटी बस सेवा बंद करणार का.?

यावल (सुरेश पाटील)

जळगाव जिल्ह्यात आणि यावल तालुक्यात दुर्गम आदिवासी भागातील तिड्या,अंधारमळी व मोहमांडली या तीन गावांसाठीची एस.टी.बस सेवा शाळांना सुट्ट्या लागल्या या कारणावरून बंद करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश अशोक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहराध्यक्ष बबलू गजरे यांनी व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात सर्व शाळा विद्यालय कॉलेज यांना सुट्या लागल्यामुळे सर्व ठिकाणची एसटी बस सेवा बंद करणार आहेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे.

(ads)

निवेदनात म्हटले आहे की, "जर शाळांना सुट्ट्या लागल्या म्हणून बस बंद करणे हा निकष असेल, तर दिवाळीच्या सुट्ट्या संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांना लागलेल्या आहेत. मग संपूर्ण महाराष्ट्रातील एस.टी.बससेवा बंद करणार आहात का? निश्चितच नाही! कारण एस.टी. बस ही केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणाची महत्त्वाची जीवनवाहिनी आहे."

(ads)

मग दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांनाच अशा प्रकारच्या गैरसोयीला का सामोरे जावे लागत आहे? आदिवासी गावांतील नागरिकांच्या प्रवासाच्या गरजांचा विचार करणे ही देखील महामंडळाची जबाबदारी आहे,असे निवेदनात नमूद केले आहे.

(ads)

भीम आर्मीच्या प्रमुख मागण्या :

तिड्या, अंधारमळी व मोहमांडली या तिन्ही गावांसाठीची एस.टी. बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी.सदर बस नियमित वेळापत्रकानुसार दररोज सुरू ठेवण्यात यावी.शाळा-

महाविद्यालयांना सुट्ट्या असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.भविष्यात कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था न करता बससेवा बंद करू नये.

(ads)

आंदोलनाचा इशारा -

वरील मागण्यांची तात्काळ दखल घेऊन बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी. अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने तिड्या, अंधारमळी व मोहमांडली येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन संबंधित प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.

(ads)

तरी प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आदिवासी जनतेच्या प्रवासाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी भीम आर्मीने केली आहे.भीम आर्मीचे यावल शहराध्यक्ष यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनावर बबलू वगैरे, उपतालुकाप्रमुख जुम्मा तडवी, पंकज डांबरे आकाश बिराडे मदन अहिरे आकाश सुरवाडे रोहित सोनवणे अर्जुन अडकमोल बंटी सोनवणे पवन पारदे सुमित तडवी सिद्धार्थ तायडे सोहम गजरे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी केली आहे.