अंतुर्ली - येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस. ए. भोई सर यांनी ध्वजारोहण केले.
[ads id='ads1]
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा अंतुरली चे पोलीस पाटील किशोर मेढे यांनी वाचनालयास सप्रेम भेट दिली.अंतुरली चे प्रथम नागरिक सरपंच सौ सुलभाताई शिरतुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. ग्रामपंचायतीत सरपंच सौ सुलभा शिरतूरे यांनी ध्वजारोहण केले .
माजी स्वतंत्र सैनिक यांचे स्तंभास माल्यारपन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक , पोलीस प्रशासन व स्टॉप, महसूल विभागाचे अधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक ,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रा. प. कर्मचारी व मराठी व उर्दू शाळा जि.प.शिक्षक बंधू भगिनी, महिला उपस्थित होत्या.