प्रहार जनशक्ती पार्टी च्या प्राथमिक सदस्य नोंदणीस सुरवात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर : शेतकरी,शेतमजूर,अपंग,अनाथ व रुग्णांचे नेते अशी ओळख असलेले राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू प्रणित 80% समाजकारण व 20% राजकारण या तत्त्वावर स्थापन झालेली प्रहार जनशक्ती पार्टी ची प्रार्थमिक सदस्य नोंदणी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष मा.अनिलजी गावंडे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.अनिलभाऊ चौधरी व जळगांव जिल्हाप्रमुख मा.विजयजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून रावेर तालुक्यातील ऐनपुर,अटवाडे, पुरी, गोलवाडे येथे रावेर तालुका युवा प्रमूख श्री. योगेश निकम व टीम ने प्रत्यक्ष जाऊन तरुण वर्गाची नोंदणी करून घेतली.

यात विशेष म्हणजे रावेर तालुक्यातील ऐनपुर गावातील दिव्यांग बांधवांचा समावेश आहे.

 सांगताना अतिशय आनंद होतोय की,आम्ही ज्या पण गावात जातोय तिथे तरुण वर्गाचा जास्त प्रतिसाद मिळतोय आणि लवकरच पूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन गाव तिथे शाखा आणि घर तिथे सदस्य करणार.

  श्री.योगेश निकम

 रावेर तालुका युवा प्रमूख

 प्रहार जनशक्ती पक्ष.

 9284951687

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!