खिरोदा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा

अनामित
निंभोरा वार्ताहर (प्रमोद कोंडे) जनता शिक्षण मंडळ सभागृह खिरोदा ता. रावेर. येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांना मोफत हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. पुरस्कारांमध्ये पत्रकारांना दोन जीवनगौरव पुरस्कार व दोन मूकनायक पुरस्कार देण्यात येणार आहे. इतरही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे. 
[ads id='ads1]
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पुरस्कार वितरण महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे हस्ते, व हेल्मेट वाटप ना. गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव जिल्हा हे असणार आहेत. व प्रमुख पाहुणे खासदार रक्षा खडसे, शिरीष चौधरी आमदार रावेर, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, रंजना पाटील जि प अध्यक्ष जळगाव अनिता येवले नगराध्यक्ष सावदा, देवयानी महाजन नगरपालिका उपनगराध्यक्ष यावल, प्रवीण सपकाळे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार संघ, किशोर रायसाकडा खानदेश विभागीय अध्यक्ष, सुरेखा पाटील जि.प.सदस्य, प्रदीप गायके ग्रामीण जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ , डिगंबर महाले उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पत्रकार संघ, हे असणार आहेत. तरी सर्व पत्रकारांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,तालुका रावेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!