शिवसेना युवासेनेने निंभोरा गांवा अंतर्गत रस्ता दुरुस्त करण्याची निवेदन देऊन केली मागणी ..या बातमीची अखेर दखल घेत मुरूम टाकण्यास सुरुवात

अनामित
रावेर वार्ताहर (प्रमोद कोंडे) निंभोरा बु. ता. रावेर शिवसेना युवासेना शाखा निंभोरा तर्फे ग्रा.पं.सदस्य स्वप्निल भिमराव गिरडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वरिष्ठ अभियंता शेख साहेब यांना दिले निवेदन देऊन, या निवेदनाद्वारे त्यांना सांगण्यात आले होते की निंभोरा बु. येथून संपूर्ण देशामध्ये केळीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, केळीची वाहतूक करणारी वाहने अवजड स्वरूपाचे असतात व रस्ता मेन गावातून आहे. 
  [ads id='ads1]
 रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. रेल्वे स्टेशन परिसर,महाजन यांच्या दुकानाजवळ,सेंट्रल बँकेजवळ,बस स्टॅन्ड लगत कोळीवाडालगत ते जे.डी.सी.सी. बँक दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघात नेहमी होत असतात त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. पावसाळ्यामध्ये पाणी साचले असता वाहनधारकांना दिसत नाहीत व त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होऊ शकतात. 
त्यामुळे तात्काळ पावसाळा सुरू होण्या अगोदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा. अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले होते.निवेदन देतांना ज्येष्ठ शिवसैनिक छोटू पाटील(रेंभोटा), माजी पं.स. सदस्य प्रमोद कोंडे, ग्रा.पं. सदस्य  स्वप्निल गिरडे, उमेश पाटील, अमीन पटेल आदि उपस्थित होते.

या कामाबद्दल वारंवार फोन द्वारे संपर्क स्वप्निल गिरडे यांनी बांधकाम विभाग अभियंता शेख , महाजन यांच्याशी केला‌. ग्रामसेवक गणेश पाटील यांनी ही समस्येचे समर्थन केले. बांधकाम विभाग अभियंता यांनी शेवटी तात्पुरती योजना म्हणुन मुरुम देण्याविषयी होकार दिला. व गावांत ठिकठिकाणी मेन रस्त्यावरील खड्डे बुजण्यात आले.व काम सुरु आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!