रावेर (वार्ताहर)लोहारा ता रावेर येथील ऐतिहासिक पिक स्वरक्षण सोसायटी चे चेअरमन संजू उर्फ जफरूल्ला जमादार यांचे हस्ते आदिवासी एकता मंच चे राज्य सदस्य मनेश तडवी यांचा आदिवासी दिनी जिल्ह्यातील आदिवासी गाव व वस्तीं मध्ये जाऊन आदिवासी समाजाला आदिवासी दिनाचे महत्व व आदिवासीच्या रूढी परंपरा जोपासण्यासाठी व कोरोनापासून बचाव कसा करावा याची माहिती गावोगावी जाऊन छोट्या छोट्या कार्यक्रमातून प्रबोधन व जनजागृती केली[ads id='ads1]
या बद्दल लोहारा सोसायटी च्या कार्यालयात एक छोट्याखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला मनेश तडवी हे आदिवासी विकास विभाग आश्रम शाळा लालमाती येथील अधीक्षक व प्रभारी मुख्याध्यापक आहेत
या वेळी लोहारा गावचे सरपंच लियाकत जामदार उपस्थित होते , व्हाईस चेरमान गणपत पवार, लोहारा दूध डेअरी सोसायटी चेरमन मुबारक तडवी, लोहारा सोसायटी चे माजी चेअरमन नासिर तडवी, समाजसेवक मेहबूब जामदार, जहागीर तडवी , बिस्मिला तडवी व आमद तडवी सर्फराज तडवी जमशेर तडवी इत्यादी सद्स्य उपस्थित होते
