कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. संदिप ठाकरे यांना इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड पुरस्काराने केलं सन्मानित

अनामित

[ads id='ads1]
नाशिक वार्ताहर (सुशिल कुवर) निर्वाण फाऊंडेशन सामाजिक संस्थेकडून शिक्षण, आरोग्य, कृषी, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारांसाठी दिला जाणारा 2021 चा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय आयडॉल पुरस्कार कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. संदिप ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. 


डॉ. संदिप ठाकरे यांनी इंटरनॅशनल आयडॉल अवार्ड हा संपूर्ण भारतातून सर्वाधिक पसंती मिळवून ऑडियन्स चॉईस अवार्ड मिळवला डॉ. ठाकरे यांना हा अवॉर्ड मिस इंडिया इंटरनॅशनल युनिवर्स क्विन शिल्पी अवस्थी व आफ्रिकन स्कॉलर सोशल अँक्टीविटी संनासी बायडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


निर्वाण फाऊंडेशन नाशिक मार्फत दिला जाणार हा इंटरनेशनल आयडॉल अवॉर्ड 2021 हा पुरस्कार सोहळा नुकताच नाशिक येथे संपन्न झाला. हा पुरस्कार सोहळा इंदिरा नगर येथील गुरू गोविंद सिंग कॉलेज च्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.

 या पुरस्कार सोहळ्याला मिस युनिव्हर्स क्वीन शिल्पी अवस्थी, अफ्रिकन स्कॉलर व सोशल अँक्टिवीस्ट संनासी बायडम, समाजसेविका तथा माऊंटन हायकर व ट्रेकर आरती प्रशांत हिरे, जेष्ठ समाजसेविका विमलताई बोथरे, निर्वाण फाऊंडेशन नाशिक चे संस्थापक निलेश यशवंत आंबेडकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

इंटरनॅशनल अवॉर्ड 2021 हा पुरस्कार सोहळ्यासाठी देशभरातून अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता निर्वाण फाऊंडेशनच्या वतीने कोविड - १९ महामारीच्या प्रादुर्भावाच्या कठीण काळात विविध क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींना इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड 2021 देऊन सन्मानित करण्यात आले. 

ही संस्था गेल्या ८ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने अनेक लहान मोठे उपक्रम राबविले जातात. तसेच गत वर्षांपासून कोविड १९ प्रादुर्भावामूळे सर्वजण अडचणीत आले आहेत. 

या कठीण काळात ही आरोग्य, शिक्षण, प्रशासन, पत्रकारिता, पोलीस आदीसह सर्वच विभागाकडून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या काळात सर्वच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा ही इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!