BJP भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल...

अनामित

[ads id='ads1]

मुंबई - बोरिवली वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथील भारतीय जनता पार्टी च्या महिला नगरसेविका संपर्क कार्यालयाआत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे तर हा प्रकार भाजपाच्या महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात घडल्याचे समोर आले आहे मुंबईतील बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे.तर या प्रकरणी बोरिवली  पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कार्यकर्त्याविरोधात बुधवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल न घेतल्याचा महिलेचा आरोप आहे.


तक्रार न करण्यासाठी भाजपा नगरसेविकेने दबाव टाकल्याचा पीडित महिलेचा दावा आहे. तसेच, भाजपाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि अंजली खेडकर यांच्या कार्यालयात आपल्याला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.


१५ ऑगस्टला काय घडलं?१५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास आरोपीने सदर महिलेला भेटण्यासाठी भाजपा कार्यालयात बोलावले. त्यानंतर आरोपीने कार्यालयाचे शटर बंद केले. लॉक करुन लाईट बंद केली.

 महिलेने आरोपीला शटर बंद करण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने ऑफिस चालू आहे, हे कोणाला कळू नये, असे कारण दिले. त्यानंतर आरोपीने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेला समाजसेवेची आवड असल्याने ती २०२० मध्ये खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती. 

पीडित महिला बोरिवली येथेही राहणारी आहे कार्यालयात आरोपीशी तिथे ओळख झाली. समाजसेवेची आवड असल्याचे पीडीत महिलेने सांगितले. आरोपीशी ओळख झाल्यानंतर मोबाइल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. महिलेचा वॉर्डच्या App Groups मध्ये समावेश करण्यात आला. त्यातून त्यांना पार्टीच्या कार्यक्रमांची माहिती मिळत होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!