6 वर्षीय मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

अनामित


हैदराबाद - दि ९ सप्टेंबर रोजी आरोपी राजूने एका 6 वर्षीय चिमुकलीच्या बलात्कारानंतर तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती त्या घटनेनंतर आरोपी हा फरार होता.यातच आता या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

[ads id='ads1]


आरोपी राजू याचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे तर तेलंगणा पोलिसांनी या आरोपीच्या मृतदेहाचे काही फोटोही Tweet शेअर केले आहेत


या बलात्कारानंतर  प्रत्येकजण आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत होते. मात्र तेलंगाणा सरकारमधील एका मंत्र्यानं "नराधमाला पकडून थेट एनकाउंटर करू" अस वक्तव्यही केलं होतं यातच आता आरोपीचा मृतदेह सापडल्याच्या सूचना मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय. .


मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी पोलिसांच्या माहितीनुसार या व्यक्तीच्या अंगावरील टॅटू आणि आरोपीच्या अंगावरील टॅटू सारखेच आहेत. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर संबंधित अधिकृत माहिती दिली जाईल

हैदराबाद पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश म्हणाले

आरोपीचा मृत्यू झाल्याची बातमी खरी आहे पोलीस आरोपीचा पाठलाग करत होते आणि त्याला शरण येण्याचा इशारा देत होते. पण, आरोपींने पोलिसांचे ऐकले नाही आणि ट्रेनसमोर उडी मारली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!