मुंबई: आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
यासाठी आज शनिवार (दि. २५) आणि रविवार (दि. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण या होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे..[ads id="ads2"]
उमेदवारांच्या अडचणी
- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही
- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही
- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही
- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य
- संकेतस्थळ अनेकदा हँग होते


