रावेर येथील पंचायत समिती सभापती यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनीधी  (राजेंद्र अटकाळे) रावेर
 पंचायत समीती सभापती सौ कविता हरलाल कोळी यांनी चक्क जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिनांक २४ सप्टेंबर शुक्रवार रोजी स्वतः जाऊ दिले निवेदन निवेदनाद्वारे सविस्तर असे की गेल्या २७ मे २०२१ रोजी झालेल्या वादळी पाऊसात १९ गावाचे नुकसान झाले आहे त्यात ८७८ घराचे नुकसान झाले असुन आता पर्यन्त शासनाने कोणत्याही फक्त आश्वासनाचा पाऊस पाडून वेळ काढू भुमिका घेत आले आहे.[ads id="ads1"]

  गेल्या दीड वर्षाच्या कोरोना काळात कामे नसल्याने अत्यंत जिकरी ने व संघर्षमय असे रावेर तालुक्यातील लोक जीवन जगत आहे त्यात असे अस्मांनी संकटात केळी पिकाचे विमा पण उतरविण्यात असमर्थता होती इतके भीषण परिस्थिती काही शेतकरी यांची झाली आहे. [ads id="ads2"]

   त्यात घराचे पत्रे, काहीचे भिंती असे बरेच नुकसान झाल्याने अजुन भीषण संकटात सामोरे जात आहे तरी आपणास निवेदन देत आहोत पंधरा दिवसात आपण शासना जवळ पाठपुरावा करून न्याय मिळावा नाहीतर एक दिवसीय उपोषण करण्यात येईल त्या प्रसंगी सईबाई आत्माराम कोळी , सिद्धी दुर्गादास पाटील,आशा बाई विनोद पाटील, कल्पना गुलाब पाटील व मनीषा जगदीश पाटील ह्या भगिनी निवेदन देताना हजर होत्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!