सर्व शक्ती सेना तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशनात प्रा. संजय मोरे तथा मायाताई संजय मोरे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 दिल्ली प्रतिनिधी : सर्व शक्ती सेना सामाजिक संघठनेचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना या महाभयंकर आजाराने संपुर्ण भारत देशामध्ये लाखो लोकांचे प्राण गेले.त्या काळामध्ये संपुर्ण महाराष्ट्रासह जळगांव जिल्ह्यामध्ये गोर गरीब होतकरू गरजवंतु यांना वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू, अन्न ,धान्य,कपडे व आर्थिक मदत मोरे परिवारसह यांनी कोरोना काळात मदत केली. चालू वर्षी सुद्धा कोरोना ने संपूर्ण परिवार आजारी असतांना सुद्धा त्यांनी गरजूंना मदत कार्य सुरूच ठेवले. [ads id="ads1"]

 मोरे परिवाराच्या सामाजिक कार्याची दखल घेत, सर्व शक्ती सेना सामाजिक संघटना यांनी प्रा. संजय मोरे , मायाताई मोरे यांना कोरोना पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- पंजाब येथील माजी केंद्रीय मंत्री पदमश्री  जितेंदर सिंग शेंटिजी ,शहिद भगतसिंग चेअरमन,  हे होते. त्या प्रसंगी विनायक महाजन ,प्रवीण धुंदले, लोकमत उपसंपादक सागर दुबे, देश दूत उपसंपादक आशीष पाटील, दिव्य मराठी पत्रकार संजय पाटील,संदीप गाढे, दीपक वानखेडे, दीपक चौधरी राजेंद्र सपकाळे ,  कृष्णा सावळे, सुरेखा इंगळे,संगीत सोनवणे, सपना इंगळे, यांना सुध्दा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[ads id="ads2"]

  या कार्यक्रमाला सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी साहेब, डॉ. सत्यनारायण जतिया, डॉ.सोहनपाल सुमनाक्षर भारतीय दलीत साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष,दिलीप पांडे मंत्री आप आदमी पार्टी वरिष्ठ नेता,  जय सुमनाक्षर सर्व शक्ती सेना राष्ट्रीय सचिव,प्रा. संजय मोरे अण्णा सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव, वैभव आहुजा ,राज विशिष्ठ, राजेंदर  गुप्ता, संपुर्ण भारत देशा तील राज्याचे अध्यक्ष यांच्या उपस्थिती होते. 

त्याप्रसंगी प्राध्यापक संजय मोरे मायाताई मोरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!