खिर्डी येथील शिक्षक प्रवीण धुंदले यांना दिल्ली येथे मिळाला कोरोना योद्धा सन्मान..

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील तत्पर फाऊंडेशनचे सचिव व दै सकाळचे  पत्रकार तथा अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विदयालयातील शिक्षक प्रवीण धुंदले यांना दिल्ली येथील सर्व शक्ति सेना यांच्या भारतीय राष्ट्रीय अधिवेशनात दिल्ली येथे कोरोना योद्धा सन्मान प्रदान करण्यात आला.[ads id="ads1"] 

  सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज सेठी, माजी केद्रीय समाजकल्याण मंत्री सत्यनारायण जतिया रमेश चंद्र जी रत्न रेल्वे बोर्ड. चेअरमन जितेंद्र सिंग शुंटी, डॉ.सोहनपाल सुमनाक्षर भारतीय दलीत साहित्य अकादमी राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप पांडे मंत्री आप आदमी पार्टी वरिष्ठ नेता, जय सुमनाक्षर सर्व शक्ती सेना राष्ट्रीय सचिव,प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव, किरण निजाई व सर्व शक्ती सेना राष्ट्रीय नेते, संपुर्ण भारत देशा तील राज्याचे अध्यक्ष तसेच सर्व खासदार आमदार यांच्या उपस्थिती मध्ये पुरस्काराचे वितरण २ ऑक्टोबर रोजी ११ वाजता गीता भवन, कमला नगर , दिल्ली येथे हा कार्यक्रम संपन्न झाला कोरोना या महाभयंकर आजाराने संपुर्ण भारत देशा मध्ये लाखो लोकांचे प्राण गेले. [ads id="ads2"] 

  मात्र त्या काळामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात गोर गरीब होतकरू गरजवंत यांना वेळोवेळी मदत केलेल्यामुळे त्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले तसेच गावात व परिसरात तत्पर फाऊंडेशन च्या माध्यमातुन जनजागृती केल्यामुळे व मदत केल्यामुळे कोरोना या आजाराला गावातुन हद्दपार केला त्यामुळे श्री प्रविण धुंदले यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुस्कार मिळाल्याबददल त्याचे सर्वत्र स्तरातुन अभिनंदन होत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!