रावेर - कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर रावेर नगर पालिका व ग्रामीण रुग्णालय रावेर यांच्या संयुक्त विद्ममाने मिशन कवच कुंडल अंतर्गत रावेर शहरात विविध ठिकाणी लसीकरण कँम्प घेऊन लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे .
[ads id="ads1"]
तरी शहरात लसिकरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून येथील नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड सुरज चौधरी यांनी रावेर विकास युवाशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात व परिसरात लसीकरण जनजागृतीसाठी फिरता रथ तयार केला आहे. या फिरत्या रथाचा नगरसेवक सुधीर पाटील यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आले,[ads id="ads2"]
फिरत्या रथाचे उद्घाटन करतांना जनजागृती रथाचा शुभारंभ करतांना आरोग्य सभापती अँड सुरज चौधरी, भास्कर महाजन, अँड राहुल मुजुमदार, राहुल चौधरी, रावेर न.पा. कार्यालय प्रमुख काळे साहेब,आरोग्य निरीक्षक युवराज गोयल, सुभाष चौधरी, भावलाल शिंदे,सुनिल चौधरी, अनिल चौधरी, दिलीप बारी, संजय चौधरी,ज्ञानेश्वर चौधरी, सलीम,तुषार मानकर ,संतोष भोई, विलास चौधरी,किरण चौधरी, अमोल कासार, पंकज चौधरी, रमेश महाजन,निलेश महाजन,काशिनाथ भोई,गणेश शिंदे,प्रफुल्ल कासार,नत्थू महाजन, शिवा,सागर चौधरी उपस्थित होते.
