आजपासून राज्यातील शाळाची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षांनी राज्यातील शाळा आजपासून सुरू (School Reopen) करण्यात आल्या असून राज्य सरकारने दिलेल्या सुचनांनुसार ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागामध्ये इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत.( today 8th to 12th std schools Reopen in the state )शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने शाळेत हजेरी लावली आहे.[ads id="ads1"] 

विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी केल्याचे पहायला मिळत आहे. शाळेने विद्यार्थांना शाळेत येताच मास्क तसेच त्यांचे सॅनिटायझेशन, टेम्प्रेंचर देखील तपासण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुले आणि पेठे देऊन शाळेत प्रवेश देण्यात येत आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये ताशे वाचवून वाजत गाजत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.


दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळेपासून दूर होते. आज विद्यार्थ्यांची शाळा सुरू होऊन त्याच्या ऑफलाईन अभ्यासाला सुरुवात होत आहे. रिकाम्या ज्ञानमंदिरात पुन्हा विद्यार्थ्यांना पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांकडून येत आहे. सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करुन दिलेल्या सूचनांचे पालन करुन शाळा सुरू करत आहोत असे देखील शिक्षकांनी म्हटले आहे.[ads id="ads2"] 

विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनी देखील शासनाच्या निर्णयाचे स्वागत करुन मुलांना शाळेत पाठवले आहे. मुले शाळेत गेल्याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर पहायला मिळत आहे.शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी देखील खुश असल्याचे पहायला मिळत आहे. ऑनलाईन अभ्यासापासून आमची सुटका झाली. आता शाळेत अभ्यास करायला मिळेल त्यामुळे खुप आनंद होत असल्याची प्रतिक्रियी विद्यार्थांकडून येत आहे.


सोशल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्यात बोलावण्यात येणार असून, काही शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नाही.


शाळा सुरू करण्यासाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना?


  • एका बॅंचवर एका विद्यार्थ्यांला बसण्यास परवानगी.
  • शाळेत स्वच्छता,निर्जंतुकीकरण सुविधा गरजेची.
  • शाळेत जाण्यासाठी पालकांची समंती असणे आवश्यक आहे.
  • जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी पायीच शाळेत जावे.
  • लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्कूल बसमध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसणार.
  • विद्यार्थ्यांनी ऑनालाईन गृहपाठ सादर करावे.
  • विद्यार्थी तसेच शिक्षकांना मास्क बंधनकारक असेल.
  • विद्यार्थ्यांनी २ मीटरचे अंतर राखणे गरजेचे.
  • शाळेच्या परिसरात कोणतेही खेळ खेळण्यास परवानगी नाही.
  • विद्यार्थ्यांना आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करणे.
  • शाळेत दवाखाना, सीएसआर निधी वापरण्यास परवानगी.

राज्यातील अनेक शाळा आजपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी' कार्यक्रम दुपारी १२ वाजता घेणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांनी युट्युबवर वा व विद्यार्थ्यांनाही दाखवावा, अशा सूचनाही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.


त्याचप्रमाणे शाळेतील मुलांना गणवेश व पाठ्यपुस्तके ताबडतोब उपलब्ध करुन द्यावीत असे आदेश देखील शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. दीड वर्षांनी शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा वापर करुन त्याचा अभ्यास घ्यावा असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही शाळांना शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!