"..तर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या गाडीसमोर आत्मदहन करणार"

अनामित
भाजपचे माजी तालुका अध्यक्ष महेश पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन
[ads id="ads2"]
तासगाव :- ( विशेष प्रतिनिधी :- अँड बसवराज होसगौडर ) तासगाव तालुक्यात महावितरणने शेतीपंपाच्या विज बिल थकबाकी वसुली साठी शेतकऱ्यांची विज कनेक्शन कापण्यास सुरवात केली असुन राजापूर ता.तासगाव येथे शेतीपंपाच्या विज बिल थकबाकी वसुलीसाठी थेट ट्रान्सफॉर्मर बंद केले आहेत. ऐन द्राक्ष छाटणी हंगामात कारवाई झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
[ads id="ads1"]
भाजपचे माजी तालुका अध्यक्ष महेश पाटील यांनी तासगाव तहसीलदार श्री.रांजणेसाहेब यांना शेतकऱ्यांसमवेत निवेदन दिले.त्यावेळी त्यांनी बंद केलेले ट्रान्स्फफाँर्मर त्वरित सुरु न केलेस पालकमंत्री जयंत पाटील यांच्या गाडीसमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गेली तिन- चार वर्षे तासगाव तालुक्यातील शेतकरी अतिव्रुष्टी,दुष्काळ व कोरोना महामारीने आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना महामारी मुळे बाजारपेठेत मालाचा उठाव न झाल्याने द्राक्षाचे दर कमी मिळाले, त्यामुळे उत्पादन खर्च व शेतकऱ्यांचे अंगलट आला आहे. बँकेचे कर्ज थकले आहेत त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशातच महावितरण वीज कंपनीकडुन कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रान्सफार्मर बंद केले जात आहेत. यामध्ये वीजबिल भरणारे शेतकरी भरडले जात आहेत बंद केल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक व मानसिक आणि शेतीचे नुकसान होणार आहे. द्राक्ष छाटणी घेतली असून पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.तरी बंद केलेले ट्रांसफार्मर चालू न केलेस पालकमंत्री जयंत पाटील यांच्या गाडीखाली आत्मदहन करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही, याची नोंद घेऊन महावितरण कंपनीस सुरू करण्याचे आदेश व्हावेत असे निवेदनात शेवटी म्हटले आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!