रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) - आज दिनांक . २६ नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने रात्रदिवस एक करून 2 वर्ष ११ महिने व १८ दिवसांनी संविधान लिहून पूर्ण केले. २६ नोव्हेंबर रोजी हे संविधान लिहून पूर्ण झाले. व २६ जानेवारीला हे संविधान भारतभर लागू करण्यात आले.
[ads id="ads2"]
म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील ग्राम पंचायतील बऱ्याच ग्रामपंचायत सदस्यांना या संविधान दिनाचा विसर पडला. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या १५ असून कार्यक्रमाला फक्त चारच सदस्य उपस्थित होते. त्यात ही आठ महिला सदस्या पैकी एकही महिला सदस्य उपस्थित नव्हती.
[ads id="ads1"]
किती खेदजनक बाब आहे. ज्या महिलांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना ५०% आरक्षण घटनेच्या मार्फत दिले आहे व त्या आरक्षणा मुळे आज महिला उच्च वर्चस्व भूषवत आहेत. आणि या महिलांना संविधान दिनाचा व संविधानाचा विसर पडत आहे. हे ऐनपूर ग्रामपंचायतीच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमाला महिलांच्या अनुपस्थितीवरून दिसून येते.आजच्या संविधान दिनानिमित्त ग्रामविकास अधिकारी प्रताप बोदडे यांनी उद्देशिकेचे वाचन केले व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा : - धक्कादायक - फैजपूर येथे गॅस कटरच्या सहाय्याने ATM मशीन तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न
संविधान दिनाचे व संविधानाचे महत्व पटवून दिले. तसेच राष्ट्रवादी क्राँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अरविंद महाजन यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्यपूर्व काळात मनुस्मृती नुसार कायदे होते व महिलांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र व अधिकार नव्हते असे सांगितले. ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच आजच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, पवन पाटील, सतीष अवसरमल, अमिल कोळी, व नागरिकांमध्ये अरविंद महाजन, बाबुलाल तायडे, अतुल पाटिल, चेतन कोंघे तसेच विजय शामराव अवसरमल व विजय के अवसरमल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
