रेंभोटा ता.रावेर येथे संविधान दिनानिमित्त अंनिसचे चमत्कार सादरीकरण संपन्न

अनामित
रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) रेंभोटा ता.रावेर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत संविधान गौरव अभियानांतर्गत चमत्कार सादरीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिनी रेंभोटा ता.रावेर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संविधान गौरव अभियानांतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जळगांव जिल्हा प्रधान सचिव राजेश वसंत रायमळे आणि कुलदीप राजेश रायमळे यांनी
[ads id="ads2"]
 चमत्कार सादरीकरण करून समाज प्रबोधन व भारतीय संविधानात अंगीकृत वैज्ञानिक दृष्टिकोन विषयक जनजागृती केली यावेळेस सर्व प्रथम छत्रपती शिवाजीमहाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर आमदार चंद्रकांत पाटील यांचे मार्फत मतदार संघातील १०० गावांमध्ये वितरित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिपैकी रेनकोट गांवची प्रत जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांना भेट देऊन छोटू पाटील आणि राजेश वसंत रायमळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
 व सामुहिक रित्या संविधान प्रास्ताविकेच वाचन करण्यात आले चमत्कार सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळेस कार्यक्रमाला उपस्यीती पुढील प्रमाणे सरपंच सपना आनंद कोळी . उप सरपंच ज्योती विजय पाटील . ग्राम सेवक कपीला गावीत ग्रा.प.. सदस्य योगिता गाढे ग्रा प सदस्य योगेश चौधरी , पंकज वाघ जेष्ठ शीव सैनीक छोटु पाटील .
पो . पा . विनोद पाटील . विजय पाटील . प्रल्हाद गाढे . समाज सेवक अविनाश गाढे अगणवाडीतील सर्व सेवीका व मदतनिस तसेच आशा वर्कर बचत गटाची सी .आर. कोळी मॅडम . गावातील मान्यवर ब्रिजलाल म्हसाणे . चिंतामण गाढे .सत पाल गादे प्रसन्न गाढे निखील गादे प्रज्योत गाढे ' जी तु भालेराव दिवाकर गाढे इत्यादी तसेच युवा व महीला मोठया संख्येने उपस्थीत होते सुत्र संचालन कांतीलाल गाढे यांनी केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!