रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) येथील श्री.व्ही.एस. नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विदयार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य. डॉ. पी.व्ही.दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.[ads id="ads2"]
याप्रसंगी सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.बी. सुर्यवंशी यांनी माल्यार्पण केले.तर IQAC चेअरमन डॉ.एस. आर.चौधरी यांनी भारतीय संविधानाचे पुजन केले.आणि प्रा. सी.पी.गाढे यांनी भारतीय संविधान उदेशपत्रिकेचे वाचन केले. संविधान गौरव दिन निमित्ताने उपप्राचार्य डॉ.सूर्यवंशी यांनी भारतीय लोकशाही मध्ये संविधानाचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .[ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस. डी. धापसे यांनी केले, तर आभार डॉ. गणपतराव ढेंबरे यांनी मानले. कार्यक्रमात प्रा.व्ही.डी. पाटील,प्रा.एम. एस. पाटील, डॉ. जे.एम.पाटील,प्रा.एस. यु.पाटील,प्रा.डॉ.सोनार,प्रा. नेमाडे, प्रा.एम. एम.पाटील, प्रा.पी.व्ही.पाटील प्रा. नरेंद्र घुले (राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी,) प्रा. संतोष गव्हाड ( सहाय्यक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी ) प्रा.डॉ.मुख्यद्ल, प्रा. उमेश पाटील प्रा.एम.डी. तायडे,श्री.युवराज बिरपन, श्री पंडित पाटील,श्री .रवींद्र पाटील, श्री.बारी,श्री।सतीश वाघ, श्री.सुनील मेढे, श्री.आशिष घुगे श्री।संतोष महाजन,श्री. युवराज धनगर, यांची उपस्थिती होती.

