जळगाव - शहरातील अतिशय गजबज असणार्या गोलाणी मार्केटमधील तिसर्या मजल्यावर बरीच कार्यालये असलेल्या लोकांना आज गुरुवार, दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आश्चर्यचकित करणारा धक्का दिला. सौ. महाजन थेट महापालिकेच्या सफाई कामगारांचा ताफा सोबत घेऊन जात चौथ्या मजल्यावर गेल्या आणि तो संपूर्णपणे आधी स्वच्छ करवून घेतला.
[ads id="ads2"] तसेच संपूर्ण मजल्यातील कानाकोपरा धुंडाळला. गेल्या चार वर्षांपासून या मजल्याची साफसफाई केली जात होती. मात्र, काही लोकांनी कार्यालय नूतनीकरणातून निघणारा मलबा व निरुपयोगी वस्तू कोपर्यांच्या ठिकाणी टाकलेल्या दिसून आल्या. त्यामुळे साफसफाई करताना या ढिगांमुळे संबंधित कामगारांनाही त्रास होत होता.
[ads id="ads1"] त्यामुळे यापुढे मार्केटमध्ये कार्यालये असलेल्यांनी व दुकानदारांनी डस्टबिनमध्येच नियमित कचरा टाकण्याची शिस्त पाळत ओला व सुका कचरा वेगळाच ठेवण्याची गरज आहे. जेणे करून सफाई कामगारांना स्वच्छता करणे सुलभ होईल, असे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन म्हणाल्या. याचवेळी या संपूर्ण मार्केटची साफसफाई करण्यात दिरंगाई अजिबात सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी संबंधित कर्मचार्यांना दिला. यावेळी महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री.एन.एम. साळुंके, आरोग्य निरीक्षक श्री.रमेश कांबळे, मुकादम श्री.रवी सनकत, श्री.इम्रान भिस्ती, श्री.अर्जुन पवार आदी उपस्थित होते.
