निंभोरा बु येथे गोरक्षकांनी केला गोमातेचा सन्मान पूर्वक अंत्यविधी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

निंभोरा बु प्रतिनिधी (प्रमोद कोंडे):  

रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथील युवकांनी एका मृत्यूमुखी पडलेल्या गाईचा केला सन्मान पूर्वक अंत्यविधी

प्राप्त माहिती नुसार असे समजतेकी ही गाय काही दिवसांपासून रस्त्यावर यें-जा करणाऱ्या लोकांना चवताळलेल्या  अवस्थेत मारू लागली होती, सदर या गाईची चौकशी निरीक्षण केले असता या गाईला कुत्र्याने चावा घेतला होता.[ads id="ads1"] 

  त्या वेदनांना त्रस्त होऊन अखेर 5/12/2021 रविवार रोजी सकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास लोकांना ती गाय रस्त्यात मरण पावलेली दिसली. ही बातमी निंभोरा गावातील युवकांना समजताच त्यांनी पुढे येऊन अंत्यविधीचा सामान घेऊन वाजंत्री वाजवत बैल गाडी मध्ये ठेवून मिरवणूक काढत नगरप्रदक्षणा करून गाईची अंत्ययात्रा काढली व गाईला मुख माती दिली.[ads id="ads2"] 

   यावेळी अंत्ययात्रेत युवा कार्यकर्ते  स्वप्नील चौधरी, नितीन पाटील, परमानंद शेलोडे, चंदु चौधरी, पिंटू चौधरी,  धीरज भंगाळे, प्रदीप चौधरी, गोलू भंगाळे ,  मिलिंद भंगाळे,  ईश्वर पाटील,  योगेश पाटील, अक्षय नेहेते, गौरव सोनवणे, रामकृष्ण धनके, माळी डॉन रिक्षा वाले राजकुमार महाजन रिक्षा वाले मंडळी, लोकमत पत्रकार दिलीप सोनवणे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच यावेळी निंभोरा गावाचे सरपंच सचिन महाले यांनी अंत्यविधी साठी खड्डा खोद कामाकरीता आपले जेसीबी यंत्र पाठवले होते. सन्मान पूर्वक युवकांनी पुढाकार घेत गो मातेचे अंत्यविधी कार्यक्रम पूजा विधी करून केल्याने सदर युवकांचे, ग्रामस्थांचे गावात  कौतुक सर्वत्र पंचकोशित होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!