रावेर येथे कोतवाल संघटनेने तहसिदार उषाराणी देवगुणे यांना दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (राजेन्द्र अटकाळे) रावेर येथे आज दि. ६ डिसेंबर सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मुंब्ई येथील होणाऱ्या  धरणे आंदोलनात रावेर तालुकयातील सर्व कोतवाल सहभागी होणार अश्या आशयाचे असे निवेदन रावेर येथील तहसिलदार सौ. उषाराणी देवगुणे यांन्या देण्यात आले.[ads id="ads1"] 

महसुल विभागाचा कान, नाक, डोळे समजले जाणारा तळागळातील शेतकऱ्यापर्यंत जाऊन प्रत्येकांच्या शंकेचे निरसन करणारा महसूल विभागातील महसूल गोळा करणे, गौण खनिज, निवडणूक, नैसर्गिस आपत्ती, पीक पाहणी असे विविध कार्यक्रमात कोतवाल अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.[ads id="ads2"] 

६० वर्षापासुन चतुर्थ श्रेणी साठी सतत झगडत आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी. तलाठी व तत्सम पद भरती मध्ये  २५ टक्के आरक्षण देण्यात यावे. सेवा निवृत कोतवालांना पेन्शन व वारसांना सेनेत समाऊन घ्यावे असे मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. तालुका अध्यक्ष सचिन कोळी, सचिव प्रेमचंद पवार, विनोद अटकाळे, प्रविण धनके, महेन्द्र चौधरी, विकास माळी यांच्या निवेदनावर सहया आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!