रावेर येथे अन्नपदार्थ व्यावसायिक कार्यशाळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



रावेर प्रतिनिधी : रावेर येथे  नुकताच  अन्नपदार्थ व्यावसायिक यांचे कार्यशाळा नुकतीच पार पडली . फूड सेफ्टी स्टँडर्ड  ऑथॉरिटी ऑफ इंडिया  (Fssai) अंतर्गत फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन कोर्स  (Fostac) अंतर्गत प्रशिक्षण पार्टनर  संचय एज्युकेशन सोसायटी
[ads id="ads1"]   तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अन्नसुरक्षा आणि मानके कायदा  2166अंतर्गत सर्व केंद्रीय आणि राज्य परवानाधारक  FBOS  आणि 955 कायदा  2006 च्या कलम 16(3) नुसार केंद्रीय परवाना किंवा राज्य परवाना असलेल्या सर्व खाद्य व्यावसायिकांनी ऑनलाईन ट्रेनींग सर्टिफिकेट कोर्स करणे अनिवार्य आहे. यामध्ये 25 प्रकारचे खाद्य व्यावसायिक नाटकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे . [ads id="ads2"] 

  यामध्ये किराणा दुकान ,दुग्धव्यावसायिक मटण , मच्छी मार्केट.  हॉटेल मिठाईवाले ,वडापाव , मेस,बेकरी  ,तसेच छोटे मोठे अन्य व्यावसायिक 25 प्रकारचे यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे . तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व अन्नपदार्थ विक्रेते यांना सदरील प्रशिक्षण घ्यावे . अन्न व्यावसायिकांना फाँसटॅग या पोर्टलवर नोंदणी करून  हायजिन रेटिंग करून त्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले जाणार आहे अशी माहिती जिल्हा नोडल ऑफिसर  फाँस  टॅक  कमलाकर धनगर यांनी दिले आहे. 

हेही वाचा : - कोविड चे नियम पाळून सावद्याची " खंडेराव " यात्रा येत्या गुरुवारी  

तसेच रावेर तालुक्यातील अन्न व्यावसायिकांना संबोधित  करत मार्केट व्यापारी संघटना अध्यक्ष कन्हैया सेठ अग्रवाल  अन्न व्यावसायिकांनी ट्रेनिंग व सर्टिफिकेट कोर्स घेणे अनिवार्य व महत्त्वाचे असल्याचे सांगितले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हैया शेठ  अग्रवाल, किराणा संघटना अध्यक्ष शैलेंद्र जी गिनोत्रा , उपाध्यक्ष अशोक मुलचंदानी  ,पंचायत समिती सदस्य पी के महाजन सर,  जळगाव जिल्हा नोडल ऑफिसर फास्टॅग संचय एज्युकेशन सोसायटी कमलाकर धनगर , रावेर तालुका फिल्ड ऑफिसर दिलीप चौकसे सर  व सर्व अन्न व्यावसायिक आदी उपस्थित होते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत फुड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेट कोर्स सर्व अन्न व्यावसायिकांनी घेणे गरजेचे आहे. - कन्हैया शेठ अग्रवाल  रावेर मार्केट व्यापारी संघटना अध्यक्ष 

जळगाव जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांमध्ये फाँस्टॅग या कार्यक्रमाची जनजागृती व रीतसर नोंदणी करीत  आहोत , यामध्ये अन्न व्यावसायिकांना  फाँस्टॅग अंतर्गत  ऑनलाईन ट्रेनिंग दिले जाणार आहे तसेच सर्टिफिकेटही दिले जाणार आहे  .  -कमलाकर धनगर  जळगाव जिल्हा नोडल ऑफिसर फॉसटॅग  संचय एज्युकेशन 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!