स्थानिक व परिससरतील भक्तगणाचे श्रद्धास्थान असलेल्या आठवडे बाजारातील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर असून परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठी ला यात्रा होत असते . यावर्षी मंदिर खुली करण्यात आली असली तरी कोरोनाच्या नवीन शासकीय आरोग्य विभागाच्या सूचना व नियमांचे पालन करून यात्रा गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता साजरी करण्यात येईल.नियमांचे पालन करून भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.[ads id="ads2"]
दिनांक ९ डिसेंबर रोज गुरुवार या दिवशी होणारी यात्रेला ३०० वर्षाची बारागाडे ओढण्याची परंपरा आहे.परंपरे नुसार दरवर्षी बारागाडे ओढण्याचा मान पवार कुटुंबातील सहाव्या पिढीचा आहे.परंपरे नुसार सुपडू पवार,वसंत पवार,अशोक पवार या वर्षी राहुल(भगत) अशोक पवार यांचा आहे. परंपरे नुसार मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सकाळ आरती,तळी भरणे पूजा,अभिषेक असे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम कोरोनाचे शासकीय नियम पाळून यात्रा उत्साहात साजरी करण्यात येईल. मागील वर्षी बारा गाडया ओढण्याची परंपरा खंडित झाली अशी माहिती भगत खंडोबा देवस्थान संस्थांचे प्रमुख यांनी सांगितले भगत , अशोक वसंत पवार व राहुल अशोक पवार हे मंदिराची धुरा सांभाळीत आहे.
हेही वाचा : - रावेरात बंद घरातून तीस हजारांची रोकड लांबवली
यात्रेत आज खेळणी ,पाळणे, हॉटेल व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारचे दुकाने यात्रेत थाटली नाही. धार्मिक कार्यक्रम होत असले तरी मंदिरात भाविक दर्शनास येताना मास्क लावून व सॅनिटर वापरून सुरक्षित अंतर ठेवून दर्शन घ्यावे .संतोष जोशी महाराज यांनी विधिवत पूजा करतील.

