महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 🔸महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन

🔹शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ करून बाबांना दिली कृतीतुन आदरांजली !

🔸 गाडगेबाबांची दशसूत्री अतिशय प्रेरणादायी - पी.डी. पाटील[ads id="ads1"] 

धरणगाव प्रतिनिधी  (पी.डी.पाटील)

धरणगांव दि. २० डिसेंबर २०२१ सोमवार रोजी सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसर व मैदान स्वच्छ करुन राष्ट्रसंत गाडगेबाबांना कृतीतून अभिवादन केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले. [ads id="ads2"] 

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षा, जेष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, पर्यवेक्षक जे.एस. पवार यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पी. डी.पाटील यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जीवनपट उलगडला त्यांचे सामाजिक कार्य सांगून स्वच्छतेचे जनक, प्रबोधनकार हीच बाबांची ओळख आहे. गाडगेबाबा चालते - बोलते विद्यापीठ आहेत. बाबांनी सांगितलेली दशसूत्री ही समस्त बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे. गाडगेबाबा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालले. आजच्या युवा पिढीला बाबांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर.सोनवणे यांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आज शाळेचा परिसर स्वच्छ करून बाबांना अनोखी श्रद्धांजली दिली. सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस.एन.कोळी यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.



#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!