रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.[ads id="ads1"]
रावेर येथील महेंद्र पाटील यांच्या धान्य गोदाम परिसरात रविवार रोजी केंद्र शासनाच्या शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी ( MLA Shirish Chaudhari) यांच्या हस्ते काटा पुजन करून करण्यात आला.[ads id="ads2"]
यावेळी ३१६ शेतकऱ्यांनी ज्वारीला २ हजार ७३८ रुपये भावाने नोंदणी केली. तर मकाला १ हजार ८७० रुपये भाव असून २३३ शेतक-यांनी नोंदनी केली आहे.
हेही वाचा : - अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अपंग महिलेची आत्महत्या ; जळगाव जिल्ह्यातील घटना
याप्रसंगी शेतकरी बांधवांचे आमदार शिरीष चौधरी( MLA Shirish Chaudhari) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी. आर. पाटील, व्हाइस चेअरमन किशोर पाटील, पुरवठा निरिक्षक अतुल नागरगोजे, मॅनेजर विनोद चौधरी आदी उपस्थित होते.

