सुवर्ण दिप वृत्तसेवा (राहुल डी गाढे) आज दि. 25-01-2022 रोजी सुनसगांव ता. भुसावळ येथे घडलेल्या फॅक्ट्रीत स्फोट होऊन दुर्देवी घटनेत मयत झालेल्या काशिनाथ सुरवाडे यांचे मुळ गांवी हतनुर निळे निशाण सामाजिक संघटना (Nile Nishan Samajik Sanghatna) संस्थापक /अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर(Anandbhau Baviskar) व पदाधिकाऱ्यांनी काशिनाथ सुरवाडे यांच्या कुटुंबीयांची सात्वन पर भेट घेतली. व सदर घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने सूनसगाव या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. [ads id="ads2"]
कंपनीच्या मालकासोबत घडलेल्या घटनेच्या संदर्भात चर्चा करून मयत काशिनाथ सुरवाडे यांच्या परिवाराला आर्थिक स्वरूपात मदत मिळाली पाहिजे.
हेही वाचा : - अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अपंग महिलेची आत्महत्या ; जळगाव जिल्ह्यातील घटना
म्हणून शासनाकडे यासाठी पाठपुरावा करून शासनाने व कंपनी मालक यांनी मयत कुटुंबातील सदस्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी अशी भूमिका निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी घेतली आहे.