रावेरला छेडखानी प्रकरणी रोड रोडरोमिओ विरुद्ध रावेर पोलिसांची धडक मोहीम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) Raver शहरातील शाळा व महाविद्यालयीन मुलींची काही शाळाबाह्य युवक छेडखानी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station) ला तक्रारी प्राप्त झालेल्या असल्याने अशा रोडरोमिओ विरोधात रावेर पोलिसांनी (Raver Police) स्वतंत्रपणे कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.[ads id="ads1"] 

रावेर शहरात (Raver City) शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरातील (City Area) तसेच ग्रामीण भागातून (Rural Area) विद्यार्थिनी येतात. मात्र शाळा (School) भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेच्या गेटवर तसेच शहरातील मुख्य चौकात काही टारगट मुले ही मुलींची वेगवेगळया कारणावरून छेड काढत असल्याच्या तक्रारी पालकांनी रावेर पोलीस स्टेशन ला केलेल्या आहे. [ads id="ads2"] 

  या प्रकाराची रावेर पोलीस स्टेशनचे (Raver Police Station)  कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक कैलास नागरे (Police Inspector Kailas Nagare) यांनी गांभीर्याने दखल घेतली असून अशा रोडरोमियों विरोधात कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 

हेही वाचा :- आ.शिरीष चौधरी यांनी नाराजी व्यक्त करीत केली भूमी अभिलेख अधिकारी कर्मचाऱ्यांची कानउघडणी

हेही वाचा :- अखेर त्या बँक व्यवस्थापकाला अटक 

शाळा (School)  भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळा परिसरात तसेच शाळेपासून बसस्टँड (Bus Stop) व   रावेर शहरातील (Raver City) मुख्य चौकापर्यंत काही युवक छेडखानी करतात. यात दुचाकी चालवून मुलींना कट मारणे, वेगवेगळे आवाज काढणे, विनाकारण हॉर्न वाजवणे, ट्रिपल सीट असणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे असे प्रकार हे रोडरोमिओ करतात. त्यावर आता रावेर पोलिसांची (Raver Police) करडी नजर असणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!