रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर (Raver) येथे आज दि. २८ जानेवारी शुक्रवार रोजी यावेळी कांताई नेत्रालयाच्या वतीने ३५ रुग्णाची तपासणी करुण १३ रुग्णाना मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.[ads id="ads1"]
कांताई नेत्रालयचे (Kantai Netralay) कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करुन माहिती दिली.
कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात चिकित्सक डॉ.जकी अहमद शेख ,व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांनी ३५ शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी १३ रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज जळगांव (Jalgaon) येथे कांताई नेत्रालेय हॉस्पीटलला पाठविण्यात आले.[ads id="ads2"]
कांताई नेत्रालयाचे (Kantai Netralay) कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील (खान्देश माळी महसंघाचे ) तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन,फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील , आबा ड्राव्हरआदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
हेही वाचा :- अखेर त्या बँक व्यवस्थापकाला अटक
हेही वाचा :- ब-हाणपूर - अंकलेश्वर महामार्ग देतोय अपघातास निमंत्रण