जळगाव मध्ये आरपीएफ जवानाला मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे) किरकोळ वादातून आरपीएफ (RPF) जवानाला जळगाव (Jalgaon) शहरातील आकाशवाणी चौकात (Akashwani Chauk)  वाहनधारकाने दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी 
शनिवार, 29 जानेवारी रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलिस (Ramanand Nagar Police) ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"] 

किरकोळ कारणावरून मारहाण

आरपीएफ कर्मचारी मनोज गिरधर मोरे (37, रा.धरणगाव, जि.जळगाव) शुक्रवार, 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता नोकरीवरून घरी जाण्यांसाठी आकाशवणी चौकात (Akashwani Chauk) वाहनाची वाट पाहत थांबले. त्याठिकाणी एक वाहनधारक धरणगाव (Dharangaon) येथे जात असल्याचे सांगितले. त्यानुसार ते चारचाकी (Four Wheeler) वाहनात बसले.[ads id="ads2"] 

   त्यानंतर वाहनधारकाने अचानक 'धरणगाव जात नाही’ असे सांगितले. याबाबत वाहनधारकाला विचारले असता वाहनधारकाने जवळील दगड उचलून मनोज मोरे यांच्या डोक्याला मारला यात ते बेशुध्द झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी मानेज मोरे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी 29 जानेवारी रोजी अज्ञात वाहनधारकाविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात (Ramanand Nagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!