भुसावळला सहा तासांचे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ : रात्रीपासून पहाटेपर्यंतची कारवाई, पाच जणांना अटक

भुसावळ उपविभाग (Bhusawal Division) हद्दीत २१ रोजी रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. यात रेकॉर्डवरील फरार आरोपी तडीपार आरोपी अटक वॉरंटमधील आरोपींना पकडण्यासह अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

  उपविभागातील एकूण ३२ आरोपी हवे होते, त्यापैकी ३ आरोपीच मिळून आले. अनिस खान सिकंदर खान (४५), सज्जाद खान अनिस खान (१९) तसेच भुसावळ शहर पोलिसांना हवा असलेला आरोपी विष्णू परशुराम पथरोड या तिघांना अटक केली. [ads id="ads2"] 

अटक वॉरंट बजावणी 

  न्यायालयाकडून विविध आरोपीविरुद्ध काढण्यात आलेल्या अटक वॉरंटमधील आरोपी तपासण्यात आले. त्यापैकी ९ आरोपींना अटक वॉरंट बजावले.

बेलेबल वॉरंट बजावणी

न्यायालयात हजर न राहणाऱ्या आरोपीविरुद्ध न्यायालयाकडून बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. यात १४ आरोपींना ते बजावले.

एक तडीपार आढळला 

भुसावळ शहरात (Bhusawal City) १० हद्दपार असलेल्यांची तपासणी केले पैकी एक जण आढळला. त्यापैकी. शाकीर ऊर्फ गोलू शेख रशिद हा हद्दपार असतानादेखील Bhusawal शहरामध्ये मिळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :- दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन गंभीर तर एक किरकोळ जखमी ;विवरे जवळील घटना 

  ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक(Jalgaon Police Supritendent) प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी(DYSP) सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन, सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महाजन, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पीएसआय अंबादास पाथरवट व पोलीस स्टेशनच्या स्टाफने केली.

रात्री फिरणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

याचबरोबर रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या तिघे आढळले. मजहर उद्दीन एजाज उद्दीन शेख (२९), जुबेर शहा कय्युब शहा (१९] शाम तायडे (२२) अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीही केली जात आहे. तसेच विविध सराईत १४ पैकी ११ गुन्हेगार घरी मिळून आले. जे गुन्हेगार घरी मिळून आले नाही, त्यांचा इतर ठिकाणी तपास केला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!