सुनील केदार यांची फैजपूर येथील प्रेरणा स्तंभाला भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

फैजपूर : Maharashtra राज्याचे पशु, मत्स्य व क्रीडा कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी रात्री फैजपूर(Faijpur) येथील धनाजी नाना महाविद्यालयातील काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती जागृत करणाऱ्या प्रेरणा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. 
[ads id="ads1"] 

  तसेच स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, गाव बनाव देश बनाव' (Gav Banav Desh Banav) हा उपक्रम घेऊन महाराष्ट्रभर निघालो आहे. शेतीसह शेळीपालनातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे.[ads id="ads2"] 

   संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhari) यांनीही मनोगत व्यक्त केले. जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, धनंजय चौधरी, हरीश गनवाणी, ज्ञानेश्वर महाजन, शहराध्यक्ष शेख रियाज, चेअरमन लीलाधर चौधरी, नंदकुमार भंगाळे उपस्थित होते. सुनील फिरके, चंद्रकला इंगळे, हर्षल दाणी, नगरसेवक कलीम मन्यार, केतन किरंगे, राजेंद्र पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य एस. एस. पाटील, प्राचार्य व्ही. आर. पाटील, प्राचार्य आर. एल. चौधरी, जावेद जनाब, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड आदीही उपस्थित होते. डॉ. जगदीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!