राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

म.गांधींचे कार्य अतुलनीय -  गुलाबरावजी वाघ

धरणगाव  येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. [ads id="ads1"] 

          तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास मान्यवरांनी माल्यार्पण केले. तद्नंतर गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी अभिवादनपर मनोगतातून व्यक्त केले की, गांधीजींनी दिलेल्या अहिंसेचा संदेश नक्कीच प्रेरणात्मक आहे. देशासाठी गांधीजींनी अतुलनीय कामगिरी केल्याने त्यांना व त्यांच्या कार्याला कधीही विसरता येणार नाही. असे श्री .वाघ म्हणाले. [ads id="ads2"] 

             याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश भागवत, जिल्हा सरचिटणीस सम्राट परिहार, भा.रा.युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंदनराव पाटील, राष्ट्रवादीचे अरविंद देवरे, संजय गांधी समितीचे महेश पवार, माजी नगरसेवक सुनील चव्हाण, दक्षता समितीचे धिरेंद्र पुरभे, बाळासाहेब जाधव, महेबूब पठाण, बुट्याभाऊ पाटील, रामचंद्र माळी, विकास लांबोळे, समाधान पाटील, योगेश येवले, विजय जनकवार, राहुल मराठे, विनोद पहेलवान, ज्ञानेश्वर महाजन, किशोर वाघ यासंह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व विविध संघटनांचे आदी मान्यवरांनी अभिवादन केले.

  कार्यक्रमाच्या अखेरीस आजच्या हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत यावेळी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!