भुसावळ तालुक्यातील फॅक्टरीत वेल्डींग करताना स्फोट : दोन कामगाराचा जागीच मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

भुसावळ प्रतिनिधी (समाधान गाढे) : तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील एका फॅक्टरीत वेल्डींग करताना अचानक झालेल्या स्फोटात दोन कामगार जागीच ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवार, 21 रोजी दुपारी 12.30 ते एक वाजेच्या दरम्यान ही घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेने Jalgaon जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मयतांमध्ये मध्यप्रदेशासह भुसावळातील मजुराचा समावेश आहे.[ads id="ads1"] 

स्फोटाने परीसर हादरला

मिळालेल्या माहितीनुसार, सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलायन्स फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतील भरलेल्या ऑईल टाकीला दोन मजुरांकडून शुक्रवार, 21 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वेल्डींग केले जात असताना अचानक स्पार्कींग(Sparking) होवून मोठा स्फोट झाला व या घटनेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने परीसरात मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.[ads id="ads2"] 

पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी

  भुसावळ तालुका पोलिस (Bhusawal Taluka Police) ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.

हेही वाचा :- "या" नगरपंचायत इलेक्शन मध्ये काँग्रेस उमेदवाराला चक्क शून्य मतं? 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!