यावल : तालुक्यातील गिरडगाव येथील रहिवासी जगन्नाथ परबत पाटील (73) हे रविवार, 16 जानेवारी रोजी चाळीसगाव येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.[ads id="ads2"]
जगन्नाथ पाटील हे दिनांक 16 रोजी चाळीसगाव येथे गेले असता बेलगंगा कारखान्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
हेही वाचा :- "या" नगरपंचायत इलेक्शन मध्ये काँग्रेस उमेदवाराला चक्क शून्य मतं?
त्यांच्यावर आधी चाळीसगाव व नंतर जळगाव येथे उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.