वाळूच्या लिलावास सहा गावांची मंजुरी
रावेर येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत सहा गावांमधून वाळू लिलावास परवानगी देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, प्रादेशिक अधिकारी म.प्र.नि.म. नाशिक डॉ. प्रवीण जोशी, प्रदूषण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, [ads id="ads2"] फैजपूर भागाचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलग,तहसीलदार उषाराणी देवगुणे,गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सहा गावांतील वाळू घाटांबाबत पर्यावरणविषयक बाबींची जनसुनावणी संबंधित सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक यांच्या उपस्थिती घेतली. सदर वाळू घाटातील लिलाव झाल्यास पर्यावरणाबाबत कोणाचीही हरकत नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. सदर वाळू घाटांची मुदत ९ जून २२ पर्यंत असेल.
हेही वाचा :- "या" नगरपंचायत इलेक्शन मध्ये काँग्रेस उमेदवाराला चक्क शून्य मतं?