भुसावळ फर्नेस ऑईलने भरलेल्या टाकीला वेल्डिंग केले जात असताना स्फोट होऊन दोघे मजूर जागीच ठार झाल्याची घटना बेलव्हाय शिवारातील दिव्या कॉपर मास्टर अॅलॉईज अॅण्ड कंपनीत २१ जानेवारी रोजी दुपारी घडली होती. [ads id="ads1"]
या दोन्ही कामगारांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेत काशीनाथ फत्तू सुरवाड़े (४०, रा. खेडी रोड, जळगाव, मूळ रा. हतनूर) आणि खेमसिंग हेमराज पटेल (Khemsing Hemraj Patel) (२६, रा. बेमतेरा, छत्तीसगड) यांचा मृत्यू झाला होता. मयत पटेल यांच्या नातेवाइकांनी जळगाव येथेच अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला, तर काशीनाथ सुरवाडे (Kashinath Surwade) यांच्यावर मूळ गावी हतनूर येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. [ads id="ads2"]
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात (Bhusawal Taluka Police) शुक्रवारी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चोपडा (Chopda) तालुक्यातील आडगाव (Adgaon) येथील कमलाकर माळी यांच्या मालकीची ही कंपनी आहे.
ठार झालेले काशीनाथ सुरवाडे हे वांजोळा(Wanjola) ग्रामसेवक(Gramsevak) आनंदा सुरवाडे यांचे लहान बंधू होत. मयत काशीनाथ सुरवाडे (Kashinath Surwade) यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या स्फोटाची चौकशी जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) यांनी सुरू केली आहे. फायर सेफ्टी व इतर चौकशी उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) यांच्यामार्फत केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी या घटनेची दखल घेतली असून, सोमवारी त्याची परवान्यांबाबत अधिक माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.