रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथे आज दि. २३ जानेवारी रविवार रोजी देशाला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करणारे, स्वातंत्र्यलढ्यात संघटन कौशल्य, समयसूचकता व मुत्सद्देगिरी या पैलूंचे दर्शन घडवत आपले व्यक्तिमत्व अधोरेखित करणारे, [ads id="ads1"] आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस(Netaji SubhashChandra Bosh) यांच्या व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thakare) यांच्या जयंती निमित्त रावेर येथील श्रीराम फाऊंडेशन (Shriram Foundation) Raver येथील कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी मराठा सेवा संघ(Maratha Seva Sangh) रावेर अध्यक्ष योगेश पाटील,संभाजी ब्रिगेड(Sambhaji Brigade) रावेर तालुका कार्याध्यक्ष योगेश महाजन,पत्रकार,सुनील चौधरी,पत्रकार राजेंद्र अटकाळे,चौबे साहेब,मराठा सेवा संघ जळगांव जिल्हासंघटक प्रशांत पाटील,मनोज शिंदे,भुसावळ ड्रिप असो.चे तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी,श्रीराम फाऊंडेशन संपर्क अधिकारी घन:श्याम पाटील ,रोहीत शिंदे आदी .उपस्थितीत होते.
हेही वाचा :- देवतारी त्याला कोण मारी ! रेल्वेगाडीखाली सुदैवाने वाचला एकाचा जीव ; नाशिक येथील घटना