सावदा प्रतिनिधी (समाधान गाढे) सावदा- गाते-उदळी रस्त्यावर स्मशानभुमी जवळ ऑटो रिक्षा (Auto Rickshaw) घेऊन घरी जात असलेल्या रिक्षास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक (क्रमांक युपी ७८ एफ एल ६७२९) यांनी जबर ठोस मारली ही घटना २१ रोजी संध्याकाळी साडे ६ वाजता घडली. [ads id="ads2"]
या अपघातात मेघा शांताराम चौधरी हे गंभीर जखमी झाले असून जितेंद्र काशिनाथ चौधरी हे जखमी झाले आहेत, दोघे राहणार उदळी (Udali) येथील असून हे घरी जात होते. जखमींना भुसावळ (Bhusawal) येथील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून अपघात घडताच ट्रक चालक पसार झाला.
हेही वाचा :- देवतारी त्याला कोण मारी ! रेल्वेगाडीखाली सुदैवाने वाचला एकाचा जीव ; नाशिक येथील घटना
या अपघाताबाबत दिलीप रामदास तायडे राहणार उदळी खुर्द (Udali Khurd) यांनी फिर्याद दिल्याने सावदा पोलीस (Savda Police) ठाण्यात केस नंबर ९/२२ नुसार कलम २७९ वगैरे ने गुन्हा दाखल करण्यात आला असून (Savda Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल संजय चौधरी तपास करीत आहे.