रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) येथील श्रीराम फाऊंडेशन कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. [ads id="ads1"]
या कार्यक्रमात आपले विचार मांडतांना फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील म्हणाले की, राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉंसाहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. [ads id="ads2"]
याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. तसेच १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो..., या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. असे आपल्या मनोगतात श्रीराम पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी रावेर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन किशोर पाटील, पं.स.सदस्य योगेश पाटील, खिरवड सरपंच महेेंद्र पाटील, वाय.एस.महाजन सर, शिवाजी येवलेसर, बंडु पाटील, प्रशांत पाटील, अतुल महाजन, राजेंद्र चौधरी, घन:श्याम पाटील आदी उपस्थित होते.

