रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
रावेर येथील स्टेशन रोडवर असलेले फुले, शाहू, आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात राजे छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस पुष्पहार जे.व्ही. तायडेसर, व केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, यांनी केले.तर दिप व धुप पुजन मा. पंकज वाघ, निळे निशाण सामाजिक संघटनेचे मा. महेश तायडे, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी फ़ुले. शाहु, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्वानी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.[ads id="ads2"]
यावेळी दिलीप तायडे, राजेश जलंकर, रितेश चौधरी, तेजस पाटील, मोहीत महाजन, सुधीर सैमिरे, अर्थव नाईक,ल नितीन बारी, अंकित कासार, ऋषीकेश नाईक, सोनु चौधरी, मनिष मानकर, स्वप्नील जलंकर, महेन्द्र पाटील, महेश तायडे, अमोल हिवरे,व मोठ्या संख्येने वाचक वर्ग उपस्थिती होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र साबळे यांनी तर आभार राहुल राणे यांनी मानले.

